पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:54+5:302021-05-26T04:14:54+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियम पालन करून शेतकऱ्यांना सोडण्यात आले. त्यात एका वक्कला बरोबर एक शेतकरी याप्रमाणे ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियम पालन करून शेतकऱ्यांना सोडण्यात आले. त्यात एका वक्कला बरोबर एक शेतकरी याप्रमाणे शेतकऱ्यांना सोडण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये बारा दिवस कडक लॉकडाऊन केले होते. यात बाजार समित्या बंद होत्या. आसमानी संकटांनी शेतकऱ्यास घेरले असताना त्यातच बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी या दुहेरी संकटामुळे शेतकरी
अडचणीत आला होता. सोमवारी बाजार समिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार समिती सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीत विक्री करण्यासाठी परवानगी मिळाल्याने आगामी दोन ते तीन दिवसांत बाजार समितीत पालेभाज्या आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी श्याम बोडके यांनी सांगितले.