उन्हाची वाढती तीव्रता पाणी अन् चारा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:11 PM2019-04-27T21:11:02+5:302019-04-27T21:11:56+5:30
खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.
खेडलेझुंगे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वत्र पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच. त्यातच विवाह मुहुर्तामुळे नागरीक हैराण झालेले आहे.
पुर्वी सारखे दारापुढे विवाह होत नसल्याने शहरातील मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र विवाह सोहळ्यादरम्यान कार्यालयामध्ये कुणीही थांबायला तयार नाही. लाग्न लागल्यानंतर हॉल ऐवजी आसपासच्या झाडाच्या सावलीमध्ये बसण्यास पसंती देत आहेत.
आज सर्वत्र साठवण बंधारे, तळे, विहीरी, नद्या आटलेल्या दिसुन येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शिल्लक पाण्याचा साठ्यामधुन उन्हाच्या प्रखरतेमुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. जल पातळी झपाट्याने कमी होत आहे.
पुढील ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची संशोधन सहयोगी, विभागीय कृषि संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडुन सांगण्यात आल्याने लोकांनी विशेष काळजी घेण्याचे लोक एक-मेकांना संगत आहेत.
गारव्याकरीता होवू लागली चर्चा
विवाह सोहळा, धार्मिक कार्य आदी ठिकाणी एकत्र आल्यानंतर नागरीक एकमेकांशी बोलताना वाढत्या तापमानाचा विचार करता या पावसाळ्यामध्ये प्रत्येक नागरीकाने किमान ५ झाडे लावुन त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. निसर्गाचे बदलेले चित्रामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीस समोरे जावे लागत आहे. जर या पावसाळ्यात झाडे लावुन संगोपन केले गेले नाही तर आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. यावर गप्पा मारताना दिसत आहे.