कांद्याचा वाढला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:43 PM2020-09-08T23:43:38+5:302020-09-09T00:49:30+5:30
नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
संजय दुनबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दक्षिण भारतात सुमारे ४२ टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असून, तेथून होणारी आवक कमी झाली आहे. याशिवाय यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे तोही आता सडू लागला आहे.
पोळ कांद्याची ज्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात झालेली नाही. महाराष्टÑात कांदा साठवणुकीची परंपरा असल्यामुळे सध्या महाराष्टÑातील शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा शिल्लक आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे कांद्याचे दर वाढले असून, यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना नसता तर कांद्याचे दर किमान तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले असते, मात्र कोरोनामुळे दर काहीसे कमी आहेत. महाराष्टÑ आणि मध्य प्रदेशातील दोन ते तीन जिल्ह्यांमध्येच कांदा साठवणुकीची परंपरा असल्याने सध्या येथील शेतकºयांकडेच कांदा उपलब्ध आहे. नवीन माल येण्यासाठी किमान पाच ते साडेपाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेडपावसामुळे आंध्र, कर्नाटकमधील मालाचे नुकसान झाले आहे. याशिवाय आपल्याकडेही लागवडीवर परिणाम झाला आहे. यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस पडला तर कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- ओमप्रकाश राका,
निर्यातदार, लासलगावपंधरा दिवसांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्ली लाल कांदा संपल्यामुळे दरवाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे यावर्षी व्यापाºयांकडेही कांद्याचा साठा नाही. जो काही कांदा आहे तो शेतकºयांकडेच उपलब्ध असल्याने दरवाढीचा शेतकºयांना थेट फायदा होणार आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव