संतुलित आहराकडे वाढला कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:05+5:302020-12-03T04:27:05+5:30
अवैध गुटखा अजूनही सुरूच नाशिक : गुटखा विक्री कायदेशीर मनाई असतानाही शहरातील दुकानांमध्ये चोरीछुपे पद्धतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे ...
अवैध गुटखा अजूनही सुरूच
नाशिक : गुटखा विक्री कायदेशीर मनाई असतानाही शहरातील दुकानांमध्ये चोरीछुपे पद्धतीने गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसते. दुकानदार लपूनछपून गुटखा विक्री करीत आहेत, तर ग्राहकांनाही गुटखा मिळण्यास कोणतीही अडचण येत नसल्याचे गुटखा बाजारात सर्रास उपलब्ध असल्याचे यावरून दिसून येते. गुटखा वाहतूक रोखण्यासाठी कारवाई होताना दिसते, मात्र दुकानांवर धाडी टाकल्या जात नाहीत.
देवळालीत येथे हरिनाम सप्ताहाची सांगता
नाशिक : देवळालीगावातील विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. येथील लोहार गल्लीत विठ्ठल-रखुमाईचे पुरात मंदिर आहे. या ठिकाणी नियमित धार्मिकविधी केले जातात. दरवर्षी या ठिकाणी कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. या सोहळ्याची नुकतीच सांगता झाली. शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन करून सप्ताह पार पडला.
थंडीबरोबरच कोरोनाचीदेखील भीती
नाशिक : थंडीचा कालावधी असल्याने अनेकांना खोकला, सर्दी आणि घसादुखीचा त्रास होऊ लागला आहे. अशी लक्षणे काेरोनाचीदेखील असण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचे म्हणणे असल्याने नागरिकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. थंडीबरोबरच अशाप्रकारचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना डॉक्टरांनी कोरोनाची तपासणी करून घेण्याचादेखील सल्ला दिल्याने पुढील काळात काळजी घ्यावी लागणार आहे.