ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

By admin | Published: October 30, 2014 10:57 PM2014-10-30T22:57:46+5:302014-10-30T22:57:56+5:30

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

Increased thieves in the Thangoda area | ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

Next

ठेंगोडा : परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात वर्षभरातील चोरीच्या घटनांची आकडेवारी बघितल्यास हा आकडा डझनाच्या वर जाईल मात्र अशा प्रकारे होतं असलेल्या चोऱ्यांच्या घटनांनंतर पोलीस यंत्रणेकडून छेडा लावला जात नसल्यामुळे पोलीस पंचनामा करून केवळ कारवाईचा फार्स करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
चोरीच्या घटना घडल्या म्हणजे पोलीस येऊन पंचनाम्याचा फार्स पूर्ण करतात; मात्र घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे चोरांचे फावते. घरातील सर्व सदस्य बाहेर गावी गेल्यावरच कुलूप तोडून चोरी झाल्याचे आजपर्यंतच्या सर्व चोरी प्रकरणात घडले आहे. आजपर्यंत बाजारपेठेतील आनंदा शेठ यांच्या घरात, शहा बंधू यांच्या घरात, शॉपिंग सेंटरमधील बापू शेवाळे यांच्या इलेक्ट्रिक दुकानात आदि ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. ठेंगोड्यात लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र होणे नित्याचा भाग झाला
आहे.
दीपावलीच्या दिवशी येथील प्रवीण रहाणे हे कुटुंबासह बाहेर गावी गेले असताना रात्री चोरांनी लोखंडी कपाट उघडून सोन्याची अंगठी व रोख रक्कम चोरून नेली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे पंचनामा केला असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलीस यंत्रणेने ठेंगोड्यात जरब बसवून कायदा सुव्यवस्थेचे वातावरण तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
नगर हत्त्याकांडाचा निषेध
मालेगाव : नगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे येथील महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे धर्मा म्हसदे, कुणाल शिंपी, रहेमत पठाण, डॉ. मनोहर जगताप आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Increased thieves in the Thangoda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.