मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांची वाढवली धाकधुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:30+5:302021-01-16T04:18:30+5:30
दारणा नदीलगत लोहशिगवे, वंजारवाडी, लहवित, नानेगाव, शेवगे दारणा, बेलतगव्हाण, दोनवाडे या गावांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून आला. मतदानासाठी हक्काचे ...
दारणा नदीलगत लोहशिगवे, वंजारवाडी, लहवित, नानेगाव, शेवगे दारणा, बेलतगव्हाण, दोनवाडे या गावांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून आला. मतदानासाठी हक्काचे एकेक मतदान आणण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. विशेष म्हणजे यंदा कोरोनामुळे मास्कसह अन्य आरोग्य नियमांचे पालन आवश्यक करण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर मास्क लावल्याशिवाय परवानगी नसल्याने मतदानाच्या स्लीपबरोबर मास्कही देण्यात येत होते.
लहवित ग्रामपंचायतीच्या एकूण जागा १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. एकूण ५ हजार १४९ पैकी ४ हजार २०२ मतदारांनी मतदान केले. याठिकाणी वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया सात वाजेपर्यंत सुरु होती.
लोहशिगवे ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात हेाते. एकूण १ हजार ९० पैकी ९४४ मतदारांनी मतदान केले.
वंजारवाडीत ९ जागांसाठी १८ उमेदवार होते. येथे १ हजार ४३६ पैकी १ हजार २८९ मतदारांनी मतदान केले.
दोनवाडे येथे ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. तेथे ८४४ पैकी ७९९ मतदारांनी मतदान केले.
नाणेगाव येथे ७ जागांसाठी २१ उमेदवार २६८३ पैकी २४२९ मतदारांनी मतदान केले, तर
बेलतगव्हाण येथे ६ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात हेाते. एकूण १९८९ पैकी १६४९ मतदारांनी मतदान केले.
शेवगेदारणा येथे ७ जागांसाठी १८ उमेदवार होते. १ हजार ३०४ पैकी ११२३ मतदारांनी मतदान केले.
...इन्फो..
पोलिसांचा उपवास
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना निवडणूक आयोगाकडून मिळणारा अल्पोपहार व दुपारचे जेवण मिळालेच नसल्याने पोलीसदादांचा उपवास घडला. पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाबाबत खर्चाची तरतूद कोणाकडे केली होती, असे अधिकारी एकमेकांना विचारत होते.
इन्फो..
१०४ वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क
नानेगाव येथे १०४ वर्षीय आजी शेवंताबाई निवृत्ती काळे यांनी व्हिलचेअरवरून येऊन मतदानाचा हक्क बजावला.
---
फोटो आरवर सेव्ह