सोमवारपासून नाशिक रोडला वाढीव पाणी : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:14+5:302021-01-21T04:15:14+5:30
नाशिकरोडच्या पाणीप्रश्नाबाबत बुधवारी (दि. २०) रामायण येथे महापाैर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आदेश ...
नाशिकरोडच्या पाणीप्रश्नाबाबत बुधवारी (दि. २०) रामायण येथे महापाैर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आदेश दिले आहेत. नाशिकरोड येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने मंगळवारी (दि.१९) झालेल्या महासभेत नाशिकरोड विभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातल्यावर महापौरांनी या विषयावर बुधवारी (दि.२०) नगरसेवक आणि अधिकारी यांची तातडीने बैठक बेालविण्याचे नियोजन केले होते. या बैठकीत नाशिकरोड विभागात ज्यादा पाण्याचा पुरवठा करतानाच या ठिकाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने सोमवारपासून (दि. २५) ४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठा करावा, असे निर्देश महापौरांनी दिले. या बैठकीस उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, प्रा. शरद मोरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, सुनील गोडसे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, जयश्री खर्जुल यांच्यासह अधीक्षक अभियंता संदीप नलावडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.