जेलरोड परिसरात वाढते अतिक्रमण

By admin | Published: October 3, 2016 12:05 AM2016-10-03T00:05:03+5:302016-10-03T00:07:20+5:30

निवेदन : त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

Increasing encroachment in the jailroad area | जेलरोड परिसरात वाढते अतिक्रमण

जेलरोड परिसरात वाढते अतिक्रमण

Next

नाशिकरोड : जेलरोड इंगळेनगर येथे चहुबाजूने अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावर विविध प्रकारचे विक्रेते बसत असल्याने त्याचा त्रास येणाऱ्या-जाणाऱ्यांना होत असून, मनपाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
जेलरोड शिवसेना विभागाच्या वतीने मनपा अधीक्षक वसंत वसावे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंगळेनगर-पाण्याची टाकी परिसरात चहूबाजूने अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
जेलरोडवर विद्यार्थी, कामगार यांची सातत्याने वर्दळ असते. या सर्व गोष्टींचा विचार करून मनपाने रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा. तसेच विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी व छोटे-मोठे अपघात टाळण्यासाठी जेलरोड पाण्याची टाकी चौकात सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर उपमहानगरप्रमुख नितीन चिडे, जेलरोड विभागप्रमुख विक्रम खरोटे, बाळासाहेब शेलार, राजेंद्र बोराडे, मसूद जिलानी, सचिन मोगल, उमेश शिंदे, योगेश जोशी, नीलेश कर्डिले, संपत आढाव, भय्या बाहेती, अरुण बोडके, रोशन पवार आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Increasing encroachment in the jailroad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.