Nashik: नाशिक शहराचा वाढता विस्तार, केंद्रासमोर १२५ बसडेपोंचा प्रस्ताव
By Suyog.joshi | Published: February 23, 2024 03:14 PM2024-02-23T15:14:41+5:302024-02-23T15:15:01+5:30
- सुयोग जोशी नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहराचा विस्तार पाहता महापालिकेने केंद्राकडे १२५ बसडेपो बांधण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ...
- सुयोग जोशी
नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहराचा विस्तार पाहता महापालिकेने केंद्राकडे १२५ बसडेपो बांधण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीएमई योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शहराला पन्नास इलेक्ट्रिक बसेस येत्या काही दिवसात मिळणार असून त्यासाठी बसडेपो बांधला जाणार आहे. याकरिता एकूण २७ कोटींचा खर्च येणार असून एन कॅप निधीतून हा खर्च केला जाणार आहे.
मनपाने सबस्टेशन उभारण्याकरिता महावितरणकडे कोटेशन मागितले होते. बसडेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी चौदा कोटी खर्च येईल. मनपा केंद्र सरकारकडून लवकरच नाशिकला पन्नास पीएमई बसेस मिळणार असून आडगाव येथे उभारत असलेल्या बसडेपोत १४ कोटी खर्च करुन महावितरणचे सबस्टेशन उभारणार आहे.त्यासाठी केंद्र सरकार अनुदान देणार असून पन्नास बस रोज चार्जिंग होतील ऐवढा वीज पुरवठा सबस्टेशनद्वारे होणार आहे. दरम्यान केंद्र सरकार बससेवा सुरु झाल्यानंतर पुढील दहा वर्षासाठी एका बससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये अनुदान मिळणार आहे. सध्या मनपाकडून सिटिलिंक बससेवा सुरू असून त्यासाठी ठेकेदार मनपाने नेमला आहे. मात्र ज्या पन्नास ई बसेस शहरासाठी येतील, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल व त्याच्याकडून शहरात बससेवा कार्यन्वित करणार आहे. सबस्टेशन उभारणे, दर महिन्याचे चार्जिंगचे बील हे एजन्सीकडून दिले जाणार आहे.