माळवाडी परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:43 PM2020-08-12T18:43:07+5:302020-08-12T18:44:25+5:30
माळवाडी : जुलैच्या मध्यमध्ये माळवाडी आणि फुलेमाळवाडी येथे अनुक्र मे एक एक कोरोना बाधित पुरु ष व महिला आढळून आले होते. त्यांच्यावर देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे उपचार करून घरी सोडण्यात आल्याने या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच माळवाडी येथे ४२ वर्षीय पुरु ष कोरोना बाधित आढळून आल्याने कोरोनामुक्त झालेल्या माळवाडी व फुलेमाळवाडी गावांत भीतीचे वातावरण पसरले, त्यानंतर त्या रु ग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले, त्यात ४२ वर्षीय पुरु ष वगळता इतर सर्व संपर्कातील अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने माळवाडी मध्ये कोरोना बाबतचे गांभीर्य कमी झाल्याचे पाहवयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क

त्यात फुलेमाळवाडी येथे २ आॅगस्ट रोजी वृद्ध महिलेचे निधन झाले. त्या अंत्यविधीसाठी नाशिक, मालेगावसह इतर ठिकाणांहून नातेवाईक हजर राहिले. त्यात अंत्यविधीच्या तीन दिवसानंतर मृत वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून यांना त्रास जाणवू लागल्याने नाशिक येथे त्यांनी आपली स्वॅब तपासणी केली असता त्यात त्यांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आल्याने अंत्यविधीसाठी हजर असणाऱ्या नातेवाईकांनी आपली तपासणी करून घेतली त्यात बुधवारी (दि.१२) माळवाडी, फुलेमाळवाडी गावांत ३५ पैकी १४ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. आधीचे २ व बुधवारचे १४ हे सर्व रु ग्ण मृत वृद्ध महिलेचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.
यामध्ये ७ पुरु ष ७ महिलांचा समावेश आहे. यात सर्व २१ ते ७८ वर्ष वयोगटातील आहेत. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांवर देवळा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहे.
देवळा शहराच्या तुलनेने माळवाडी फुलेमाळवाडी येथे कोरोना रु ग्णांची संख्या झपाट्याट्याने वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.