श्रद्धाविहार कॉलनीत वाढते अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:34 PM2019-07-16T23:34:46+5:302019-07-17T00:38:10+5:30
श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढत्या अतिक्रमणामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा पालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण वाढतचआहे़
इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ वाढत्या अतिक्रमणामुळे मार्गक्रमण करणे मुश्कील झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा पालिकेला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमण वाढतचआहे़
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत श्रद्धाविहार कॉलनी असून, बंगले आणि दिवसागणिक वाढणाऱ्या आपार्टमेंट व सोसायटीमुळे वसाहत वाढत आहे. त्याचबरोबर लोकवस्ती झपाट्याने वाढत असून, परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी रस्त्यावर ये-जा करावी लागते.
परंतु श्रद्धाविहार कॉलनीच्या वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दिवसागणिक टपऱ्यांचे अतिक्र मण वाढत आहे. त्यामुळे कॉलनीतून बाहेर निघताना रस्त्यावरील वाहने दिसत नसल्याने तो रोज लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता ही टाळता येत नाही. तातडीने अतिक्र मण काढण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
सदर कॉलनीमध्ये एक माध्यमिक शाळा व महाविद्यालये असून, त्याठिकाणी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. त्यांनाही मार्गक्र मण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.