शरयूनगर रस्त्यावर अंधारामुळे मद्यपींचा वाढता उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:42 AM2019-08-27T00:42:48+5:302019-08-27T00:43:26+5:30

धार्मिक सण, उत्सवाच्या काळात इंदिरानगरच्या जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदीप बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन येथे मद्यपींचा उपद्रव वाढला आहे.

 Increasing nuisance of alcoholic beverages on the streets of Saryunagar | शरयूनगर रस्त्यावर अंधारामुळे मद्यपींचा वाढता उपद्रव

शरयूनगर रस्त्यावर अंधारामुळे मद्यपींचा वाढता उपद्रव

Next

नाशिक : धार्मिक सण, उत्सवाच्या काळात इंदिरानगरच्या जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदीप बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन येथे मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मद्यपींचा व टवाळखोरांच्या त्रास होत असल्याने नागरिकाकंडून संताप व्यक्त होत आहे.
शहरात एककीकडे सण उत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण संचारलेले असताना संपूर्ण शहरात रोषणाईने उजळून निघणार आहे. मात्र दुसरीकडे उपनगरांमधील रस्त्यांवर मात्र पथदीप असल्याने उपनगरीय नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागतो आहे. असाचप्रकारे इंदिरानगरमधील जगन्नाथ चौकातील शरयूनगर मार्गावर दिसून येत आहे.
या रस्त्यावर अंधार असल्याने परिसरातील टवाळखोर आणि मद्यपींचा उपद्रव वाढला असून, अनेकदा रस्त्यावरच मद्याच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार घडतात. त्याचप्रमाणे सकाळ-सायंकाळच्या सुमारास जॉगिंगसाठी बाहेर पडणाºया नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत असून, अनेकदा सरपटणाºया प्राण्यांचेही या भागात दर्शन होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या रस्त्यावरील पथदीप सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Increasing nuisance of alcoholic beverages on the streets of Saryunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.