आरोग्य संवर्धनासाठी ‘जिम’कडे वाढता कल

By admin | Published: December 9, 2015 11:48 PM2015-12-09T23:48:16+5:302015-12-09T23:48:49+5:30

फिटनेस फंडा : तरुणाईबरोबर आबालवृद्धांची जॉगिंग ट्रॅकवर गर्दी

Increasing trend towards 'gym' for healthcare | आरोग्य संवर्धनासाठी ‘जिम’कडे वाढता कल

आरोग्य संवर्धनासाठी ‘जिम’कडे वाढता कल

Next

गायत्री जेऊघाले, नाशिक
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच थंडीचा कडाका जाणवू लागला असून, आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तरुणवर्गाचा ‘जिम’मध्ये जाण्याचा वाढता कल असून महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची पहाटे फिरायला जाण्याची संख्या वाढली आहे.
हिवाळा ऋतू आरोग्यवर्धक व बलदायी समजला जातो. हिवाळा सुरू होताच सर्वांचे लक्ष शरीर सुदृढ करण्याकडे वळते. थंडीचा तडाखा जाणवायला लागला की, शहरवासीयांची पाऊले आपोआप जिमकडे वळायला लागतात. जिम हा हिवाळ्यासाठीचा फिटनेस फंडाच ठरत आहे. नाशिकमध्ये सध्या थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी उबदार कपड्यांबरोबरच जिम लावणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तरुणवर्गाबरोबरच इतर वर्गांचीही जिममध्ये जाण्याची संख्या वाढली आहे. जिमबरोबरच पहाटे जॉगिंगला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिमबरोबरच ग्रीन जिमलादेखील शहरवासीयांची विविध उत्स्फूर्त प्रतिक्रिया बघायला मिळाली आहे. शहरात विविध ठिकाणी जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणीच ग्रीन जिमची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.
शहरामध्ये आता अनेक जिममध्ये मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत. लेग प्रेस, लेग कर्ल, आर्मफुल डाऊन, फटेड रो अशा अनेक मशिनरी आता नाशिक रो दी प्लॅन्क तसेच पुरुषवर्गासाठी बायसेप कर्ल आता उपलब्ध आहेत. शहरात गेल्या ३-४ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आणि त्याचबरोबर जिममध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत १०-१२ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.
थंडीमध्ये शरीराला खऱ्या अर्थाने गरज असते ती, ऊर्जा निर्माण करण्याची. अशावेळी जिम हे एक वरदानच मानले जाते. थंडीमध्ये लागण्याचे प्रमाण वाढले अशा वेळी वजन न वाढविण्यासाठी जिम, व्यायाम, जॉगिंग अतिशय महत्त्वाचे ठरते. त्वचेबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. फक्त जिम नाही तर जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम आणि झुंबा या ठिकाणीही शहरवासीयांची गर्दी वाढली आहे. या सर्व व्यायामप्रकारांचे वैशिष्ट्य म्हणजे, हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा वाढतो. याचबरोबर स्टॅमिना वाढल्याचे जाणवू लागते.
हिवाळ्यामध्ये आरोग्यदायी राहण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजेच जिम. त्यामुळे तरुणांबरोबर इतर वर्गांचाही जिममधील क्रेझ वाढली आहे.

Web Title: Increasing trend towards 'gym' for healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.