इन्सानियत ही हैं धर्म वतन का...

By admin | Published: May 25, 2017 01:17 AM2017-05-25T01:17:05+5:302017-05-25T01:17:23+5:30

नाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले..

Indaniyat is the only religion | इन्सानियत ही हैं धर्म वतन का...

इन्सानियत ही हैं धर्म वतन का...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले... परंतु तेथे सारे चित्रच वेगळे... बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत वसलेल्या गावांतील गावकरी वेगळे, अतिथ्यशील आणि माणुसकीला जपणारे महत्त्वाचे म्हणजे याच आपल्याच मुल्काला देश मानणारे... सेवा धर्माचे पालन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या वैद्यकीय व्यावसायिकांना ही ‘इन्सानियत’ दिसली. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये गेलेल्या अकरा वैद्यकीय पथकाला हा अनुभव आला. धुमसत्या काश्मीरात आपल्याच देशबांधवांकडून मायेचा ओलावा निर्माण करावा यासाठी या संस्थेच्या माध्यमातून अशाप्रकारचे प्रयत्न केले जातात. काश्मीरच्या विविध भागांत अगदी पाकिस्तानच्या जवळ असलेल्या भूभागापर्यंत जेथे दुबळी सरकारी यंत्रणा पोहोचत नाही, तेथे देशाच्या अन्य भागातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याची आणि पर्यायाने देशाच्या अन्य भागातील नागरिक आपल्या बरोबरच आहेत याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने एक वैद्यकीय पथक १० ते २० मे च्या दरम्यान जाऊन आले. यात वणी येथील डॉ. मधुकर आचार्य, डॉ. अस्मिता आचार्य, डॉ. रामदास भोई व डॉ. सुवर्णा भोई, डॉ. सुदेश बोरा व डॉ. रोशनी बोरा, डॉ. सतीश भांबरे, जळगाव येथील डॉ. धर्मेंद्र पाटील तसेच बॉर्डरलेस फाउंडेशनचे ऋषिकेश परमार यांचा प्रामुख्याने यात समावेश होता.
तेथील वसतिगृहात राहणे आणि ग्रामस्थांबरोबरच नाश्ता, भोजन करताना या पथकाने तेथील अंतरंग जाणून घेतल्यानंतर त्यांना काश्मीर बाहेर भासवले जाणारे हे चित्रच चुकीचे असल्याचे दिसले. देशाशी निष्ठावान असलेले नागरिक बेरोजगारी आणि अल्प शिक्षणाने पीडित आहेत. पर्यटन हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने पर्यटनावर अवलंबून राहतात. त्यामुळेच येथे येणारे अन्य राज्यातील नागरिक आणि पर्यटकांना कधीही ते दुखावत नाहीत.  सैन्य किंवा स्थानिक पोलिसांच्या कारवाईला विरोध करणारे नागरिकही मोजकेच आहेत. अन्य नागरिकांना आता अशा घटनांची सवय झाली आहे. काश्मिरी नागरिक सेवेसाठी आलेल्या नागरिकांविषयी कृतज्ञताच व्यक्त करतात. त्यांनाही शांतता हवी असल्याचे मनही ते मोकळे करतात.
अर्थात, सर्वच काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही तर काही ठिकाणी अतिरेक्यांना शोधण्यासाठी झालेली कारवाई आणि त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि सैन्यावर केलेली दगडफेक असे अनुभवही घेतले.

Web Title: Indaniyat is the only religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.