‘इंदू सरकार’ चित्रपट विरोधात कॉँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:51 AM2017-07-29T01:51:35+5:302017-07-29T01:51:35+5:30
आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित मधुर भांडारकर निर्मित ‘इंदू सरकार’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, खासदार स्वर्गीय संजय गांधी यांची चुकीची माहिती, वक्तव्य दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित ‘इंदू सरकार’ हिंदी चित्रपटात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आयनॉक्स चित्रपट गृहाबाहेर इंदिरा कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित मधुर भांडारकर निर्मित ‘इंदू सरकार’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, खासदार स्वर्गीय संजय गांधी यांची चुकीची माहिती, वक्तव्य दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या निदर्शन आंदोलनातील माजी मंत्री शोभा बच्छाव, शहर अध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, लक्ष्मण मंडाले, संतोष ठाकूर, मुन्ना ठाकूर, बबलु खैरे, उद्धव पवार, ज्युली डिसुझा, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, इजाज सय्यद, कामील इनामदार, कुसुम चव्हाण, अनिल बहोत, राहील शेख, अब्दुल चौधरी, अतुल हांडोरे, रिझवान शेख आदिंसह कार्यकर्त्यांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सुटका केली. दरम्यान, इंदू सरकार चित्रपटात इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तो प्रदर्शित करू नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना काँग्रेसच्या वतीने देण्यात आले होते.