धान्य व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:09+5:302020-12-11T04:41:09+5:30
सेवा शुल्क आकारणीबाबत धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन दिले; मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने ...
सेवा शुल्क आकारणीबाबत धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन दिले; मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बंद ठेवला. धान्य व्यापारी सेस भरण्यास तयार नाहीत व कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रक्कम वसूल करण्यासाठी मागे हटत नसल्याने आगामी कालावधीत हा वाद कायम राहणार असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सकाळी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर नाशिक घाऊक किराणा व्यापारी संघटनेच्या सभासदांनी काही काळ ठिय्या मारून निदर्शने केली, तसेच बाजार समिती विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. यावेळी प्रफुल संचेती, मनोज वडेरा, कल्पेश बेदमुथा, भावेश मानेक, भावेश पटेल, राजेश कटारिया आदींसह व्यापारी उपस्थित होते.
इन्फो==
अनियंत्रित धान्य मालावर सेवा शुल्क
बाजार समिती उपविधी कलम १६/४ नुसार पणन मंडळाच्या संचालकांनी दिलेल्या निर्णयानुसार अनियंत्रित धान्य मालावर सेवा शुल्क वसूल केले जात आहे; मात्र व्यापारी शुल्क भरत नाहीत. मागील लेखापरीक्षण अहवालात सेवा शुल्क वसूल केले नसल्याने संचालक मंडळावर ठपका ठेवला आहे. सेवाशुल्क वसुलीपोटी बाजार समिती धान्य व्यापाऱ्यांना रस्ते, वीज, पाणी,
आणि सुरक्षा पुरविते.
-अरुण काळे, सचिव बाजार समिती
----
इन्फो===
तोडगा न निघाल्यास बेमुदत बंद कायम
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अडवणूक धोरण अवलंबून व्यापाऱ्यांची गळचेपी करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने सेस रद्द करावा. कोरोना काळात व्यापाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सेवा पुरविली. त्यामुळे यात शासनाने हस्तक्षेप करून तोडगा काढावा.
-प्रफुल संचेती, अध्यक्ष धान्य किराणा घाऊक व्यापारी
(फोटो आहे)