पिंपळगावी कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 04:31 PM2020-10-26T16:31:25+5:302020-10-26T16:31:50+5:30
पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहे
पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहे
शासनाने १४ सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतिच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या कांदा पिकावर विपरित परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध लादले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात व्यापार्यांनी बुदत संपाचे हत्यार उगारले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, नांदगांव, चांदवड, येवला आदी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असतांना या सर्व घटनाक्रमामुळे कांद्याचे भाव घसरणार असून, शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे.
व्यापाऱ्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान ......
दोन टनापर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा व्यापार्यांवर लादल्याने व्यापारी जास्त माल खरेदी करू शकत नाही. त्याचा परिणाम कांदा दरावर होऊन शेतकर्यांचे नुकसानच होणार आहे.
कांदा लिलाव बंद हा व्यापाऱ्यांच्या निर्मित नसून तो शासनाच्या निर्णयानुसार झालेला आहे साठवणुकीवर निर्बंध आणल्याने घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी जास्त कांदा खरेदी करू शकत नाही. शिल्लक असलेला माळ डिसप्याच होत नाही तोपर्यंत व्यापारी नव्याने माल खरेदी करू शकत नाही म्हणून हा बंद आहे
- प्रदीप दरगुडे कांदा व्यापारी,
पिंपळगाव बसवंत
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत कांदा विक्रीसाठी नेणार नाही.
- माधव चौधरी कांदा उत्पादक शेतकरी,
पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता.