Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:09 AM2021-08-15T11:09:58+5:302021-08-15T11:11:02+5:30

Independence Day 2021: चालत्या जिप्सीवर भारतीय तोफखाना केंद्राचे 50वर्षीय लेफ्टनंट कर्नल लक्ष्मी धार भुयान हे वीस फूट उंच शिडीवर  शीर्षासन योग मुद्रेत सुमारे तासभर राहत विक्रम केला.

Independence Day 2021: An hour-long 'Shirshasana' on a running gypsy, a lieutenant colonel in the Indian Army performed yoga on Independence Day | Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग

Independence Day 2021: धावत्या जिप्सीवर एक तास 'शीर्षासन', स्वातंत्र्य दिनी भारतीय सेनेतील लेफ्टनंट कर्नलनी साधला योग

Next

 नाशिक : चालत्या जिप्सीवर भारतीय तोफखाना केंद्राचे 50वर्षीय लेफ्टनंट कर्नल लक्ष्मी धार भुयान हे वीस फूट उंच शिडीवर  शीर्षासन योग मुद्रेत सुमारे तासभर राहत विक्रम केला. वर्ल्ड गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक,इंडिया बुक, लिम्का बुक, अमेरिका बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. (An hour-long 'Shirshasana' on a running gypsy, a lieutenant colonel in the Indian Army performed yoga on Independence Day)

ऑन व्हील प्रथमच तासभर शीर्षासन योग मुद्रेत मैदानाला फेरी मारणारे भुयान हे प्रथमच योगपटू ठरणार आहे.  नाशिक येथील भारतीय तोफखाना केंद्रातील ग्यानी स्टेडियम मैदानात हा अनोखा जागतिक विक्रम होत आहे. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर भुयान हा विक्रम करीत आहेत. या सोहळ्याला नाशिकचे प्रधान मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, सत्र न्यायाधीश डी.डी कर्वे, एम.एस बोराडे, आर्टिलरी सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडियर ए.राजेश उपस्थित आहेत.

Web Title: Independence Day 2021: An hour-long 'Shirshasana' on a running gypsy, a lieutenant colonel in the Indian Army performed yoga on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.