जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:10 PM2020-08-17T23:10:35+5:302020-08-18T01:14:18+5:30

येथील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते झाला. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, उपनिरीक्षक गजानन राठोड, विशाल सनस, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, एस.पी. भादेकर व विविध शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Independence Day celebrations are in full swing all over the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा

मुख्य शासकीय प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण करताना प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील आदी.

Next
ठळक मुद्दे कोरोनायोद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यात भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण झाले.
शासकीय ध्वजारोहण
येथील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते झाला. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, उपनिरीक्षक गजानन राठोड, विशाल सनस, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, एस.पी. भादेकर व विविध शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी मानवंदना दिली. यावेळी विविध शाळांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नगर परिषदेचे कर्मचारी, आरोग्य विभाग, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका, महसूल कर्मचारी आदींचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जय योगेश्वर पतसंस्था
येथील जय योगेश्वर पतसंस्थेचे ध्वजारोहण येथील मधुमालती या संस्थेच्या कार्यालयात संचालक संतोष भालेराव यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष दिलीप गारे, उपाध्यक्ष महेश गुजराथी, संचालक किशोर चोबे, व्यवस्थापक जाकीर शहा, मधुकर जाधव, अमोल तांदळे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती
चांदवड बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात उपसभापती नितीन रघुनाथ आहेर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक निवृत्ती घुले, विलास ढोमसे, सहाय्यक निबंधक पाटोळे, सचिव जे. डी. आहेर व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
अध्यापक विद्यालय
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित सौ. लीलाबाई दलूभाऊ जैन अध्यापक विद्यालयात स्वातंत्र्यदिन कोरोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून साजरा झाला. प्राचार्य धनंजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रध्वजाला शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. यावेळी प्रा. विजय गुंजाळ, नरेंद्र पवार, योगेश हिरे आदी उपस्थित होते.
वडाळीभोई जिल्हा परिषद शाळा
वडाळीभोई येथे स्वातंत्र्यदिन साजरा केल्याची माहिती मुख्याध्यापक शोभा कैलास सोनवणे, ज्योती जाधव यांनी दिली .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळीभोई या शाळेत शालेय समिती अध्यक्ष कैलास सूर्यभान जाधव यांच्या हस्ते ध्वजपूजन व भीमराव आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी वडाळीभोई येथील सरपंच अनिता सुखदेव जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी सभापती सुखदेव जाधव व सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत उपसरपंच नवनाथ जाधव, माजी उपसरपंच निवृत्ती घाटे, पोपट संधान, महेश खैरनार व सदस्य उपस्थित होते. यावेळी दीपक भदाणे यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब धाकराव यांनी आभार मानले. शोभा सोनवणे, ज्योती जाधव, सुधा पगार, संगीता जाधव, सुधाकर कोष्टी, वंदना पगार, वंदना पवार, राजेंद्र पवार, वंदना जाधव, सुरेखा भदाणे, अजिनाथ जोगदंड, मनीषा जाधव, स्वाती तारलकर, श्रीमती पगारे उपस्थित होते.
जे. आर. गुंजाळ विद्यालय
येथील जे. आर. गुंजाळ विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. प्रास्ताविक प्राचार्य एस. टी. पगार यांनी केले. ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन आनंदा मनोहर बनकर यांनी केले. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष विजय कोतवाल, अभिनव बालविकास शालेय समिती अध्यक्ष प्रकाश शेळके, शंकरराव जाधव, उत्तमराव पवार, नगरसेवक जयश्री हांडगे, नगरसेवक अश्पाक शेख, बाळासाहेब शिंदे, भारती शिंदे, निर्मला पवार, सीमा आवारे, राजेंद्र बोरसे, अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक जमदाडे सर, ज्येष्ठ शिक्षक एस. पी. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन जिभाऊ शिंदे यांनी केले, तर आभार डी. एम. न्याहारकर यांनी मानले.

Web Title: Independence Day celebrations are in full swing all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.