अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

By admin | Published: November 12, 2016 10:36 PM2016-11-12T22:36:15+5:302016-11-12T22:40:21+5:30

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

Independent candidates increased 'headache'! | अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

अपक्ष उमेदवारांमुळे वाढली ‘डोकेदुखी’!

Next

गिरीश जोशी  मनमाड
मनमाड पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू पाहात आहेत. उपद्रव मूल्य ठरणाऱ्या अपक्ष उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी या ना त्या प्रकारे आपल्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात मनमाड येथे सर्वाधिक १६२ उमेदवार रिंगणात असून, यामध्ये ५८ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवित आहेत.
विविध उद्दिष्ट्य डोळ्यांसमोर ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हौशा, नवशा गवशा उमेदवारांमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. यात पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. परंतु हे बंडखोर त्या त्या पक्षासाठी अडचणीचे ठरत आहेत. माघारीच्या दिवशी ५९ अपक्षांनी माघार घेतली असली तरी तब्बल ५८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काही अपवादात्मक प्रबळ असे अपक्ष उमेदवार आहेत. ते सोडता काही उमेदवारांचे उद्दिष्ट वेगळे असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी माघार घेताना काही अपक्ष उमेदवारांनी मी या प्रभागातून उमेदवारी केली होती मात्र मी माघार घेऊन अमुक उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले असून, महायुती व आघाडी न झाल्याने शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होणाचे चित्र आहे. त्यामुळे बसपा व एमआयएमआयएम या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत चांगलेच रंग भरले आहेत.
निवडणुकीसाठी १६२ उमेदवार रिंगणात असून, यात तब्बल ५८ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अपक्षांची मोठी संख्या पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरू पाहात आहे. निवडणुकीच्या रिंगणात महिलासुद्धा मागे नसून, एकूण ८४ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १४ अ व १४ ब मध्ये सर्वाधिक प्रत्येकी १० उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागात अपक्षांची संख्या अधिक आहे. दोन्ही प्रभागात प्रत्येकी ६ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये काही प्रबळ उमेदवार असले तरी प्रभागपद्धतीच्या निवडणुकीमुळे त्यांना अडचण निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या अपक्ष अर्जामुळे बंडखोरीचा वनवा सर्वच पक्षांना लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षाने उमेदवारी नाकारलेले नाराज तसेच अपक्ष उमेदवारांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ अशा अविर्भावात निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. पराभव झाला तरी हरकत नाही पण आता माघार नाही या इर्षेने अनेक उमेदवार पेटून उठले आहेत. या उपद्रव मूल्य ठरलेल्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Independent candidates increased 'headache'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.