कांदा अनुदानाचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 07:21 PM2019-02-24T19:21:11+5:302019-02-24T19:21:47+5:30
देवळा : देवळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकºयांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्र ी केला आहे. प्रतिक्विंटल २०० रूपये कांद्याला अनुदान देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु ज्या बाजार समितीत शेतकºयांनी कांदा विक्र ी केला असेल त्याच बाजार समितीत शेतकºयांना अनुदान मागणीचे अर्ज जमा करावे लागत असल्यामुळे चांदवड बाजार समितीत कांदा विक्र ी केलेल्या देवळा तालुक्यातील शेतकºयांची गैरसोय होत आहे.

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचा एक कर्मचारी देवळा येथे कांदा अनुदान मागणीचे अर्ज स्विकारण्यासाठी नेमावा अशी मागणी देवळा तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.
देवळा तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकºयांनी चांदवड बाजार समितीत आपल्या कांद्याची विक्र ी केलेली आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे या शेतकºयांना नुकसान सोसावे लागले. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या/खाजगी बाजार समितीमध्ये दि. १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी२०१९ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना २०० रु पये प्रति क्विंटल, व प्रती शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवळा तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदान योजनेसाठी पात्र ठरले. परंतु चांदवड येथे कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी चांदवड येथे कांदा अनुदान मागणी अर्ज जमा करावे लागत आहेत. यासाठी लागणारे सातबारा उतारे आॅनलाईनने मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. तसेच तलाठींना शोधण्यासाठी शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. अनेक अडाणी शेतकºयांना कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे देवळा ते चांदवड असे हेलपाटे मारावे लागत आहेत.
चांदवड देवळा बससेवा कमी प्रमाणात असल्यामुळे हया शेतकºयांचा दिवस वाया जातो. तसेच कागदपत्रात जर अपूर्तता असेल तर दोन दिवस अर्ज जमा करण्यासाठी जातात. आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराविक कालावधीसाठी त्यांच्या एका कर्मचाºयाची नेमणूक देवळा येथे अनुदान मागणीचे अर्ज स्विकारण्यासाठी करावी व तालुक्यातील शेतकºयांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे.