सारोळेथडी येथे स्वतंत्र फिडर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:20 PM2019-01-18T13:20:21+5:302019-01-18T13:20:32+5:30
निफाड : नांदूरमध्यमेश्वर विद्युत उपकेंद्रातून सारोळेथडी गावासाठी ११ के व्ही चे स्वतंत्र फिडर सुरू झाल्याने सारोळेथडी गावात समाधान व्यक्त करण्यात आले.
निफाड : नांदूरमध्यमेश्वर विद्युत उपकेंद्रातून सारोळेथडी गावासाठी ११ के व्ही चे स्वतंत्र फिडर सुरू झाल्याने सारोळेथडी गावात समाधान व्यक्त करण्यात आले. पूर्वी नैताळे वीज उपकेंद्रातून सारोळे थडी धारणगाव वीर धारणगाव खङक या तीन गावांना वीज पुरवठा केला जात होता. मात्र अति वीज भारामुळे या तिन्ही गावचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सारोळेथडी सह या तिन्ही गावचे शेतकरी वैतागले होते . वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत होते .नांदुरमध्यमेश्वर वीज उपकेंद्रातून गावाला स्वतंत्र फिडर द्यावे अशी मागणी गावाने वीज वितरण कंपनीकडे करीत होते निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी याकामी विशेष प्रयत्न केले. वीज उपकेंद्रातून सारोळेथडी गावांपर्यंत पाच ते सहा किमीचे अंतराचे ११ के व्ही चे स्वतंत्र फिडर सुरू झाले व सारोळेथडी गावाला व कृषी पंपाना सुरळीतपणे वीज पुरवठा होऊ लागला आहे . त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्यावतीने सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी यावेळी संजय नागरे ,विलास नागरे ,विठ्ठल नागरे विलास दादा नागरे, जनार्दन नागरे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.