भारतात होणार ‘आइस्क्रीम डे’ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:01 AM2019-08-03T01:01:04+5:302019-08-03T01:01:43+5:30

इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय बैठकीत भारतात ह्यआइस्क्रीम डेह्ण साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आइस्क्रीम दिवस साजरा करताना भारतातील सर्व मल्टिनॅशनल उद्योगांसोबत परदेशी उद्योगांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

India begins 'Ice Cream Day' | भारतात होणार ‘आइस्क्रीम डे’ला सुरुवात

नाशिकमध्ये आयोजित भारतातील आइस्क्रीम उत्पादकांच्या बैठकीप्रसंगी अरुण आइस्क्रीमचे चांद्रमोगन. समवेत सुधीर शाह, आशिष नहार, सुशील वर्मा, बाळाराजू, नरसिम्हन, जॉन आदी.

Next
ठळक मुद्देआइस्क्रीम असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

सातपूर : इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय बैठकीत भारतात ह्यआइस्क्रीम डेह्ण साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आइस्क्रीम दिवस साजरा करताना भारतातील सर्व मल्टिनॅशनल उद्योगांसोबत परदेशी उद्योगांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.
भारतातील आइस्क्रीम उत्पादकांची प्रथमच नाशिकला राष्ट्रीयस्तरावरील बैठक घेण्यात आली. या बैठकीस अरुण आइस्क्रीमचे चांद्रमोगन, स्कुफ आइस्क्रीमचे सुधीर शाह, फन इंडिया डेअरीचे आशिष नहार, दिनशॉ आइस्क्रीमचे सुशील वर्मा, डेअरी डे आइस्क्रीमचे बाळाराजू, फॅब आइस्क्रीमचे नरसिह्ना, लाझा आइस्क्रीमचे फॅसिस जॉन आदी उपस्थित होते. प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना आइस्क्रीम व डेअरी उद्योगांच्या विकासासाठी व लघु उद्योगांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास प्रयत्न करणे, आइस्क्रीम व डेअरी उद्योगांना १८ टक्के जीएसटी लावला जात आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून दर कमी करण्याची मागणी करणे यांसह विविध विषयांवर मंथन करण्यात आले. आइस्क्रीम व डेअरी उद्योगांना पोषक वातावरण असल्याने महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योजकांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन आशिष नहार यांनी यावेळी केले.
भारतात विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आइस्क्रीम उत्पादनास मागणी असल्याने याच हंगामात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आइस्क्रीम डे साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच व नाशिकमध्ये सर्वप्रथम इंडियन आइस्क्रीम मॅनुफॅक्टरर्स असोसिएशच्या बैठकीचा मान मिळाल्यामुळे भविष्यात नाशिक जिल्ह्णातील आइस्क्रीम व डेअरी उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करता येतील याचबरोबर असोसिएशनद्वारे नवीन उद्योगांना संस्थेमध्ये सहभागी करून त्यांच्या विकासासाठी संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती नहार यांनी दिली.
शेतकऱ्यांकडून दूध घेणार
या पुढे सर्व आइस्क्रीम व डेअरी उद्योगांशी संबंधित उद्योगांनी शेतकºयांकडून दूध विकत घेण्याचे ठरविण्यात आले. जेणे करून शेतकºयांना दुधाला आवश्यक दर मिळू शकेल. फूड सेफ्टी कायद्यात असलेल्या विविध समस्यांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. आइस्क्रीम व डेअरी उत्पादनास भारतातील सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांच्या गरजेनुसार उत्पादनात वेगवेगळे बदल करून दर्जेदार उत्पादन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title: India begins 'Ice Cream Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.