भारत बंदचा बाजारपेठेला फटका, नाशकात ५० टक्के उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:31 PM2018-09-10T17:31:40+5:302018-09-10T17:39:20+5:30

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०)  केलेल्या भारत बंदचा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठया प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली. 

India collapses in market, 50 percent turnover turnover | भारत बंदचा बाजारपेठेला फटका, नाशकात ५० टक्के उलाढाल ठप्प

भारत बंदचा बाजारपेठेला फटका, नाशकात ५० टक्के उलाढाल ठप्प

Next
ठळक मुद्देभारत बंदमुळे नाशकात ५० टक्के उलाढाल ठप्पघाऊकपेक्षा किरकोळ बाजाराला बसला अधिक फटका दुपारनंतर व्यवहार सुरळीत, परंतु दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा

नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०)  केलेल्या भारत बंदचा फटका नाशिकच्याबाजारपेठेलाही मोठया प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली. नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा शालीमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहील्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त  केला आहे.गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खेरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यावहार सुरळीत झाले. मात्र ाअनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागली. तर अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूतीने पेट्रोल डीझेल दरावाढीचा निषेध करण्यासाठी दुकाने बंद ठेववल्याचे दिसून आले.

किरकोळ बाजारही प्रभावित 
भारत बंदचा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या तुलनेत ग्राहकांचा ओघ नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे  सर्वाधिक झाल्याचे दिसून आले. 

Web Title: India collapses in market, 50 percent turnover turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.