नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 02:08 PM2018-09-27T14:08:05+5:302018-09-27T14:13:31+5:30

नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली.

'India Post Payment Bank' to be held in Nashik | नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’

नाशकात ३२६ ठिकाणी होणार ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’

Next
ठळक मुद्दे इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकची (आयपीपीबी) मुहूर्तमेढ रोवली. ३२६ ठिकाणाहून नागरिकांना या बॅँकिंग सुविधेचा नाशिक विभागात लाभ

अझहर शेख, नाशिक : टपालखात्याचा भारतीय बॅँक व्यवस्थेत पाया भक्कम करण्यासाठी व आधुनिक बॅँकिंग सुविधा टपालखात्यामार्फत ग्राहकांना पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नुकतीच इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकची (आयपीपीबी) मुहूर्तमेढ रोवली. आयपीपीबीचा विस्तार मुख्य टपाल कार्यालयअंतर्गत डिसेंबरअखेर होण्याची चिन्हे आहेत. उप टपाल कार्यालय, शाखा टपाल कार्यालये अशा ३२६ ठिकाणाहून नागरिकांना या बॅँकिंग सुविधेचा नाशिक विभागात लाभ घेता येणार आहे.


काळासोबत चालत टपाल खाते कात टाकू लागले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संदेशवहनाची ताकद वाढली आहे. त्यामुळे केवळ टपालांचा बटवडा यापुरतेच मर्यादित राहून चालणार नसल्याने केंद्र सरकारकडून टपालखात्याला विविध शासकिय योजना बॅँकिंग व्यवस्थेमधील टपालाचा प्रवेश, कोअर बॅँकिंगद्वारे टपाल कार्यालयांची जोडणी आणि आता ‘इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक’ अशा विविध नाविन्यपूर्र्ण प्रयोगांमधून टपाल खाते काळानुरूप बदलत आहे. नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालयात स्वतंत्रपणे ‘आयपीपीबी’चे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली.
--
‘आयपीपीबी’चे मोबाईल अ‍ॅप
इंटरनेट बॅँकिंगपासून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएसपर्यंत सर्व बॅँकिंग सुविधांसह ई-पे बिलींगचीही सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट बॅँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळविता येते. तसेच पोस्टपेड, प्रिपेड मोबाईल कनेक्शनचा रिचार्जदेखील या अ‍ॅप्लिकेशनद्वारे सहज करता येतो. यामुळे टपाल खात्याची बॅँकिंगव्यवस्था ‘स्मार्ट’ झाली आहे. खाते उघडण्यासाठी आरंभिक ठेव रक्कम शुन्य असून बचत खात्यावरील शिल्लक रकमेवर तिमाही चार टक्के असा व्याजदर असल्याची माहिती ‘आयपीपीबी’नाशिकचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र आघाव यांनी दिली. खाते उघडल्यानंतर खातेधारकाला एक क्यू-आर कार्ड दिले जाते, हे कार्ड म्हणजे त्याचे पोस्ट बॅँकेचे स्मार्ट पासबूकच.

Web Title: 'India Post Payment Bank' to be held in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.