भारताची प्रगती वेगाने
By admin | Published: January 19, 2017 12:48 AM2017-01-19T00:48:13+5:302017-01-19T00:48:32+5:30
केशव उपाध्ये : त्र्यंबकेश्वर येथे कर्मचाऱ्यांचा सत्कार
त्र्यंबकेश्वर : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना पत देण्याचे काम केले आहे. आपला देश वेगाने प्रगतीकडे जात असून, त्यामध्ये सरकारने राबविलेल्या योजनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.
युवा सप्ताहानिमित्त ‘प्रगत भारत, डिजिटल भारत’ या विषयावर व्याख्यान देताना, तसेच सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कामगार, स्वयंसेवक, देवस्थान कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सत्कारप्रसंगी जाहीर कार्यक्रमात उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा त्र्यंबकेश्वरच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार अपूर्व हिरे, अॅड. श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे, शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, महिला आघाडी शहराध्यक्ष माधुरी वैभव जोशी, उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव उपस्थित होते. कार्यक्र माची सुरुवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा-पूजनाने झाली. उपाध्ये यांचा सत्कार युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर, हिरे यांचा सत्कार सरचिटणीस भावेश शिखरे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायधनी यांचा सत्कार मयूर वाडेकर, लढ्ढा यांंचा सत्कार सरचिटणीस अमित झोले, तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे यांचा सत्कार अभय सरडे, शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र यांचा सत्कार उपाध्यक्ष रोहन शुक्ल व उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव यांचा सत्कार चिटणीस भूषण दाणी यांनी केला. युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रास्ताविक, तर सुयोग देवकुटे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)