भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:38 PM2018-08-11T21:38:07+5:302018-08-11T21:42:19+5:30

पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली.

Indian Air Force: My Color De Basanti Chola ... | भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...

भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...

Next
ठळक मुद्देये देश हैं वीर जवानो का..., ऐ मेरे वतन के लोगो..., या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली

नाशिक : ‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ ये देश हैं वीर जवानो का...’, ‘जींदगी मौत ना बन जायें संभालो यारो..., अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.
निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली येथील वायूसेना केंद्राच्या वतीने आयोजित भारतीय संरक्षण व स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि संगीत संध्या मैफलीचे. उंटवाडी येथील सिटी सेंटरमॉलमध्ये शनिवारी (दि.११) झालेल्या या देशभक्तीपर कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवळाली केंद्राचे एअर कमांडोर विशिष्ट सेवा मेडल रवी शर्मा यांच्यासह वायुदलाचे विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते.


यावेळी पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. यानंतर सिम्फोनी-४०, कॉर्नफ्लिड रॉक, भारतीय क्लासीकल राग बहार, जुबी डुबी, ये मेरा दिल (हिंदी मेलोडी), सुनो गौर से दुनियावालों..., अशा विविध गीतांची धून बॅन्ड पथकाच्या वादकांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत सादर करत उपस्थितांची मने जींकली. मैफलीचा समारोप ‘वंदे मातरम्...,’ च्या धूनने करण्यात आला. यावेळी ये देश हैं वीर जवानो का..., ऐ मेरे वतन के लोगो..., या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. उपस्थित श्रोत्यांनी मैफलीच्या समारोपप्रसंगी ‘भारत माता की जय...’ अशा घोषणा देत देशभक्तीचा जागर केला.
भारतीय वायुसेनेचा जगात चौथा क्रमांक लागतो. युध्दामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या वायूदलाच्या वतीने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन अशा पध्दतीने देशक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम शहरात सादर करण्यात आला. सुत्रसंचालन सुजीतकुमार झा यांनी केले.

प्रश्नमंजुषेचा उत्साह
संगीत मैफलीच्या प्रारंभी वायुदलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व सैन्यदलाशी संबंधित दहा ते पंधरा विविध सामान्यज्ञानावर आधारित वैकल्पिक प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना विचारण्यात आले. यावेळी बहुतांश नाशिककरांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अचूक उत्तरे देणा-या प्रेक्षकांना वायूदलाच्या वतीने ‘कॅप’, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Indian Air Force: My Color De Basanti Chola ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.