गांधी चष्म्याच्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डतर्फे नोंद, नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:13 PM2017-12-16T16:13:15+5:302017-12-16T16:29:15+5:30

Indian Book of Records of Gandhi Chashmani Reporter, Recorded by Nashik | गांधी चष्म्याच्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डतर्फे नोंद, नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

गांधी चष्म्याच्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डतर्फे नोंद, नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

googlenewsNext
ठळक मुद्देतरुण पिढीपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचावेत तसेच अहिंसेचा संदेश त्यांना समजावा या हेतुने हा चष्मा तयार करण्यात आलागेल्या वर्षी वसंत ठाकुर यांनी महात्मा गांधीची यांची भव्य टोपी साकारली. या भव्य टोपीची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद

नाशिक- नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने गांधीजयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोंबर २०१७ रोजी राष्टपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅप रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकतेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकुर यांना देण्यात आले. या आगळ्या वेगळ्या विक्रमामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींनी दिलेल्या लढ्याची पुढिल पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने कॉँग्रेस सेवादलातर्फे गांधीजींच्या चष्म्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आजच्या तरुण पिढीपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचावेत तसेच अहिंसेचा संदेश त्यांना समजावा या हेतुने हा चष्मा तयार करण्यात आला होता. गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील कॉँग्रेस भवन येथे ठेवण्यात आलेला हा भव्य चष्मा बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. गांधीजींच्या विचारांचा संदेश देणाºया या विक्रमाची इंडियन बुक आॅफ वर्ल्ड रकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी(दि.१५) वसंत ठाकुर यांना याबाबतचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मिळाले. या विक्रमाबाबत नाशिककरांकडून त्यांचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.


विक्रमाची पुनरावृत्ती
गेल्या वर्षी वसंत ठाकुर यांनी महात्मा गांधीची यांची भव्य टोपी साकारली होती. या भव्य टोपीची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली होती. आता चष्म्याच्या प्रतिकृतीची नोंद घेण्यात आल्याने विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे.

Web Title: Indian Book of Records of Gandhi Chashmani Reporter, Recorded by Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.