भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 11:35 PM2017-08-02T23:35:24+5:302017-08-03T00:47:13+5:30

संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.

Indian culture continues to guide | भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

Next

येवला : संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.
येथील स्वामी समर्थ केंद्राचा वास्तुशांती सोहळा व औदुंबराची मुंज या कार्यक्र मा निमित्त मोरे यांनी येथील केंद्रात मार्गदर्शन केले. तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील सर्व सेवेकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. गुरु माऊली मोरे यांचे येथे आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सचिन शिंदे यांनी तर केंद्राच्या वतीने नारायण शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्राच्या सेवेकºयांनी सेंद्रिय शेती, गर्भसंस्कार, शेतीवास्तुशास्त्र, सण व व्रत वैकल्य तसेच भारतीय संस्कृतिची जोपासना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रदर्शने या कार्यक्र मात लावलेले होते. केंद्राच्या वास्तुशांती निमित्त दुर्गा सप्तशतीचा सामुदायीक पाठ, वास्तुशांती व औदुंबर मुंज पूजा झाली. गुरु माऊली मोरे यांनी केंद्रातील नवीन दरबारात प्रथमच येवून मार्गदर्शन केल्याने सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवेकºयांची वाढती संख्या विचारात घेवून पारायणासाठी जागा व मुख्य दरबाराची जागा अपुरी पडू लागल्याने केंद्राचे बांधकाम वाढवण्याचे वर्षापूर्वी ठरले. अल्पावधीत परिसरातील व तालुक्यातील सेवेकºयांनी स्वयंस्फुर्तीने मदत केल्याने आज प्रशस्त व केंद्र साकारले आहे. याठिकाणी औदुंबाराचे झाड लावण्यात आले असून त्याची मुंज देखील झाली.भाविकांच्या संख्येत वाढपारेगावरोड येथे दिंडोरी प्रधान केंद्रातर्फे सन १९८५ मध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले होते. एका खुर्चीवर स्वामींच्या प्रतिमेची गुरु वारी व सोमवारी आरती केली जायची. पुढे हळूहळू सेवेकºयांची संख्या व सेवेकरी विस्तारत गेले आणि केंद्रही सभागृहामध्ये साकारले. मागील काही वर्षात येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या केंद्रा तर्फे गुरु चरीत्र पारायण, संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शिर्ष पठण, कोटमगाव येथे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पारायण, कोपरगाव रोडवरील म्हसोबा मंदिरात अपघात टाळण्यासाठी महामृंत्युजय यज्ञ, तसेच सावरगाव येथील स्वामी समर्थ पिठात पारायण व विविध विषयावर व्याख्यान आयोजित केली जातात.

Web Title: Indian culture continues to guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.