भारतीय तोफखान्याचा गनर्स डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:24 IST2018-09-29T00:23:20+5:302018-09-29T00:24:34+5:30
भारतीय सैन्यदलाचा कणा व युद्धात महत्त्वाची विजयी भूमिका ठरविणारे दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय तोफखान्याचा १९१ वा गनर्स डे नाशिकरोड केंद्र येथे लष्करी थाटात साजरा करण्यात आला.

भारतीय तोफखान्याचा गनर्स डे साजरा
नाशिक : भारतीय सैन्यदलाचा कणा व युद्धात महत्त्वाची विजयी भूमिका ठरविणारे दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय तोफखान्याचा १९१ वा गनर्स डे नाशिकरोड केंद्र येथे लष्करी थाटात साजरा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ सैन्य अधिकाºयांनी उपस्थित राहून शहिदांच्या स्मृतींना मानवंदना दिली. नाशिकरोड येथे भारतीय तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच देवळाली येथे स्कूल आॅफ आर्टिलरी आहे. या दोन्ही केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने शुक्र वारी (दि. २८) सकाळी सालाबादप्रमाणे तोफखाना केंद्रातील शहीद स्मारकावर अभिवादन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विशिष्ट सेवा मेडल कमांडंट लेफ्टनंट जनरल आर.एस. सलारिया उपस्थित होते. तोेफखान्याचा अभिमानास्पद वारसा, वैभवशाली इतिहास, व्यावसायिक कौशल्य, उत्साह व शौर्य आठवावे. सर्वत्र इज्जत-ओ-इक्बाल हा उद्देश घेऊन तोफखाना केंद्र देशसेवेच्या प्रगतिपथावर अग्रेसर असल्याचे सलारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी तोफखाना केंद्राचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बँडपथकाने बिगुल वाजवून मानवंदना देत सलामी दिली. यावेळी काही सशस्त्र जवानांनी शहिदांना अभिवादन केले. घोडेस्वार जवानांनी लक्ष वेधले. तोफखाना अस्तित्वात आल्यानंतर सर्वात अगोदर ५ माउंटन बॉम्बे बॅटरी १८२७ साली गठित करण्यात आली, तेव्हापासून दरवर्षी दि. २८ सप्टेंबर रोजी गनर्स डे साजरा करण्याची परंपरा कायम आहे.