भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

By Azhar.sheikh | Published: August 18, 2018 04:45 PM2018-08-18T16:45:03+5:302018-08-18T16:46:48+5:30

भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली.

Indian Haj pilgrims wrapped up in Makkah | भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

भारतीय हज यात्रेकरुंनी मक्केत फडकविला तिरंगा

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यभरातून सुमारे १५ हजार यात्रेकरू हजला रवाना प्रती यात्रेकरूला सुमारे १२ हजारांचा फटका यावर्षी हजयात्रा महागली जरी असली तरी उत्साह कायम जिल्ह्यातून सुमारे एक हजार दोनशे यात्रेकरू हजयात्रेसाठी

अझहर शेख, नाशिक : भारतातून सौदी अरेबियामधील मक्का शहरात सर्व हज यात्रेकरुन सुखरुप पोहचले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन सर्व भारतीय हजयात्रेकरंनी एकत्र येत उत्साहात मक्कामध्ये साजरा केला.बुधवारी (दि.१५) सकाळी भारतीय हजयात्रींनी  तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली.
‘मिना’ परिसरात सर्व यात्रेकरु मुक्कामी आहे. या ठिकाणी जगभरातून आलेल्या यात्रेकुरंना एकसारखे निवास तंबु सौदी सरकारकडून उभारण्यात आलेले आहेत. यामुळे कोण यात्रेक रु कुठले आहेत, याची ओळख पटविण्यासाठी तंबूंच्या परिसरात असलेले राष्ट्रध्वजांची महत्त्वाची भूमिका असते. ‘मिना’ भागात भारतीय हज यात्रेकरुं च्या तंबूंच्या परिसरात फडकणाऱ्या तिरंगा ध्वजाला सर्व भारतीयांनी एकत्र येत मानवंदना दिली.
जिल्ह्यातून सुमारे एक हजार दोनशे यात्रेकरू हजयात्रेसाठी रवाना झाले आहेत. रविवारी (दि.१२) अखेरच्या तीन विमानांनी मुंबईमधून सौदीच्या जेद्दाह विमानतळाच्या दिशेने उड्डाण केले. राज्यभरातून सुमारे १५ हजार यात्रेकरू हजला रवाना झाले आहेत. यावर्षी प्रती यात्रेकरूला सुमारे १२ हजारांचा फटका एकूण खर्चामध्ये बसला आहे.
दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ या उर्दू महिन्यात धनिक मुस्लीम बांधव हजयात्रेसाठी रवाना होतात. इस्लामच्या पाच मुलस्तंभांपैकी एक स्तंभ ‘हज’ असल्याचे धर्मगुरू सांगतात. ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा दरवर्षी पार पडते. देशभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू हजयात्रेला रवाना झाले आहेत. यावर्षी हजयात्रा महागली जरी असली तरी उत्साह कायम असल्याचे दिसते.
जिल्ह्यातील मालेगावसह सर्व तालुके मिळून बाराशे यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून हजयात्रेला गेले आहेत, तर तीनशेपेक्षा अधिक यात्रेकरून खासगी हज टूरमार्फत गेल्याचे समजते. यावर्षी भारत सरकारची ‘जीएसटी’ आणि सौदी सरकारचा ‘वॅट’ यामुळे यात्रेच्या एकूण खर्चात प्रती यात्रेकरूला अंदाजे बारा हजार रुपये अधिक मोजावे लागल्याची माहिती जिल्हा हज समिती समन्वयक जहीर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलाताना दिली. एक हज यात्रेकरूला यावर्षी सुमारे दोन ते अडीच लाखांपर्यंतचा खर्च यात्रेसाठी आला. सबसीडी केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे हजयात्रेकरूला विमान खर्चात मिळणाºया सवलतीपासूनही वंचित रहावे, लागल्याची खंत शेख यांनी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, हज समितीच्या मुंबई मुख्य कार्यालयाशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्याबाबत उदासीनता दर्शविली.

Web Title: Indian Haj pilgrims wrapped up in Makkah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.