रशियातील भारतीय विद्यार्थ्यांचा सन्मान
By admin | Published: August 1, 2016 01:17 AM2016-08-01T01:17:22+5:302016-08-01T01:17:48+5:30
रशियातील भारतीय विद्यार्थ्यांचा सन्मान
नाशिक : रशिया या देशात वैद्यकीय शास्त्र शिकण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची विशेष पसंती असून, पालकांनी नि:संकोचपणे विद्यार्थ्यांना रशियाला पाठवायला हवे, असे मत डॉ. भूपेंद्र मगाड्रे यांनी रविवारी
(दि. ३१) गंगापूररोड येथील हॉटेल बिग सिटीमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले.
रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. मगाड्रे यांनी रशियामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने चांगले वातावरण असून, विद्यार्थ्यांना भाषा, वास्तव्य तसेच खाण्याची अडचण येत नसल्याचे सांगितले. यावेळी रशियातून शिक्षणक्रम पूर्ण करून आलेले तसेच आता भारतात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. रोहित अग्रवाल (दिल्ली), डॉ. प्रिया वासने (पुणे), डॉ. अविनाश काळे (अहमदनगर) यांचा गौरव करण्यात आला. या मेळाव्यास रशियास्थित २५० भारतीय विद्यार्थी उपस्थित होते.
या मेळाव्याप्रसंगी कविता शुक्ल, वैभवी गुजराथी, मानसी वडघुले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून रशिया देश सुरक्षित असून, याठिकाणी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मेस तसेच हॉस्टेलची वेगळी सुविधा असल्याचे
सांगितले. यावेळी ओएसएएच विद्यापीठाचे समन्वयक डॉ. भूपेंद्र मगाड्रे, भारतीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी डॉ. दीपेश रसाळ, एस. एस. साळुंखे आणि प्रा. व्ही. आर. रसाळ यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)