परदेशात लाज काढणाऱ्या भारतीय पर्यटकांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:19 AM2019-07-29T01:19:59+5:302019-07-29T01:21:06+5:30

‘चेक आउट’ करून निघालेल्या भारतीय पर्यटकांचे वाहन रिसॉर्टच्या आवारात अडवले आहे... रिसॉर्टचे अधिकारी त्या वाहनातले सामान बाहेर काढून भरलेल्या बैगा विस्कटून झडती घेत आहेत...

 Indian tourists who embarrass foreigners | परदेशात लाज काढणाऱ्या भारतीय पर्यटकांची पोलखोल

परदेशात लाज काढणाऱ्या भारतीय पर्यटकांची पोलखोल

Next

नाशिक : ‘चेक आउट’ करून निघालेल्या भारतीय पर्यटकांचे वाहन रिसॉर्टच्या आवारात अडवले आहे... रिसॉर्टचे अधिकारी त्या वाहनातले सामान बाहेर काढून भरलेल्या बैगा विस्कटून झडती घेत आहेत... कपड्यांच्या गुंडाळ्यांमध्ये दडवलेल्या वस्तूमागून वस्तू बाहेर पडतात. साबण, शाम्पू, टॉवेल्स, चादरी, हेअर ड्रायर इत्यादी... हे सगळे रिसॉर्टमधून का चोरले? असा जाब रिसॉर्टचे अधिकारी विचारत आहेत. पोलिसांना बोलावण्याचे फर्मान निघते आहे. आणि हा सगळा तमाशा पाहात उभे असलेले भारतीय पर्यटक कुटुंब अजिबात कसनुसे वैगेरे झालेले नाही. ‘ही फैमिली टूर आहे, पोलिसांना बोलावू नका. आम्ही या वस्तूंचे पैसे भरतो’, असे जणू धमकावत एक मध्यमवयीन स्त्री सगळे प्रकरण फटाफट निपटू पाहाते आहे. तिच्याने काही होत नाही हे पाहून या कुटुंबातला पुरुष पुढे होतो आणि रिसॉर्टच्या अधिकाऱ्यांना ‘बाजूला घेऊन’ खास भारतीय पद्धतीने तोडपाणी करू पाहातो पण ते अधिकारी बधत नाहीत. हातात सोन्याचे कडे मिरवणारा तो पुरुष ‘वी विल पे...वी विल पे’ चा हेका धरतो तेव्हा त्या बेमुर्वतखोरीने वैतागलेले अधिकारी चिडून म्हणतात, ‘वी नो यू हॅव लॉट आॅफ मनी!’
सध्या सोशल मीडियावर व्हायरल असलेली ही क्लिप एव्हाना बहुतेकांनी पाहिलेली असेल. ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ पाहणाºया बाहुबली भारताला लाज आणणारा हा प्रसंग बालीमधल्या एका महागड्या रिसॉर्टमध्ये घडला आहे.
हा मेसेजही क्लीपसोबत फिरतो आहे. जगभरच्या
आपल्याला हे नक्कीच पाळता येईल
विमानतळ, विमानाचा अंतर्भाग, बसेस-रेल्वे, हॉटेल्स-रिसॉर्टच्या लॉबीज ही गोंधळ घालण्याची, मोठ्याने बडबडण्याची, मुलाबाळांना बागडू देण्याची ठिकाणे नव्हेत.
विमान प्रवासात अतिरिक्त मद्यासाठी हट्ट धरणे, केबिन क्रूशी हुज्जत घालणे, स्वच्छतागृह घाण करणे, वचावचा खाणे, केबीन क्रूने परवानगी देण्याआधी आपापले मोबाईल सुरू करणे टाळावे.
हॉटेलच्या खोलीत इंडक्शन शेगडीवर खिचडी टाकणे, टी-मेकरमध्ये नूडल्स शिजवणे, इस्त्रीवर पापड भाजणे हे प्रकार टाळावेत. नाईट गाऊन्स घालून खोलीबाहेर पडू नये.
परदेशात जिथे राहणार त्या हॉटेल/रिसॉर्टच्या खोलीतल्या वस्तू तुमच्या वापरासाठी असतात, ‘घेऊन जाण्यासाठी’ नव्हे हे लक्षात ठेवावे. ब्रेकफास्ट ‘फ्री’ असतो, तो भरपेट खाण्यासाठी. तेथील अन्नपदार्थ, फळे, ड्रायफू्रटस्, साखरेच्या छोट्या पुड्या उचलून पिशवीत भरणे अत्यंत अनुचित आहे.
ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये इथे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा.
‘रांग’ ही सभ्य जगातली एक शिस्त आहे. ती काटेकोर पाळावी. देशाबाहेर आपण आपल्या देशाचे ‘प्रतिनिधी’ असतो, हे लक्षात ठेऊन सभ्यतेने वागावे-वावरावे. आणि महत्वाचे, हे सगळे आपल्या देशात असतानासुध्दा करावेच.

Web Title:  Indian tourists who embarrass foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.