प्रामाणिकतेतून साधावा भारताचा विकास - हनुमंत गायकवाड
By Admin | Published: February 18, 2017 12:57 PM2017-02-18T12:57:39+5:302017-02-18T12:57:39+5:30
भारताचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यकअसल्याचे प्रतिपादन बीव्हीजीचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 18 - भारताचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणे आवश्यकअसल्याचे प्रतिपादन बीव्हीजीचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांनी केले.
नाशिक येथे 'संवाद २०१७' चे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी हे जग बदलण्यासाठी १०० नचिकेता वृत्तीचे तरूण हवे असे म्हटले होते.
मी त्या १०० तरुणांपैकीच एक असल्याचे समजतो. त्यामुळेच सतत तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले.ई अॅण्ड जी गुरूकूलतर्फे संवाद २०१७ या उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.