धोकादायक इमारतींबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:41 PM2020-08-04T21:41:05+5:302020-08-05T01:12:22+5:30

मालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे.

Indifference to dangerous buildings | धोकादायक इमारतींबाबत उदासीनता

धोकादायक इमारतींबाबत उदासीनता

Next
ठळक मुद्देस्ट्रक्चरल आॅडिटचा विसर : मालेगावी प्रभागनिहाय सर्वेक्षण नावाला


मालेगाव शहरातील धोकेदायक इमारती.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरात १९२ इमारती धोकेदायक असल्याची नोंद महापालिकेकडे असली तरी या इमारतींबाबत मनपा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. केवळ धोकेदायक इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून इमारतमालकांना नोटिसा बजावण्यात मनपाने धन्यता मानली आहे.
राज्यात धोकेदायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकेदायक इमारत-मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य न दाखवता केवळ नोटिसा बजावत आहे. खासगी धोकेदायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कुणी, असा सवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरात आठ हजार ६५२ अनधिकृत बांधकामे झाली आहेत. संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेतली नसल्यामुळे मनपाचा महसूल बुडत आहे. शहरात १५ अतिधोकेदायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत, तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. या १९२ इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावर महापालिकेच्या नगररचना, बांधकाम व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही.प्रशासनाची डोळेझाक सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरातील धोकेदायक इमारतींबाबत महापालिकेची उदासीन भूमिका दिसून येत आहे. ठोस कारवाई केली जात नाही. वर्षभरात सुमारे पाचशे ते सहाशे नवीन बांधकामांना परवानगी दिली आहे, मात्र धोकेदायक इमारती, मनपा मालकीच्या इमारती व भूखंडांबाबत महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे.

Web Title: Indifference to dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.