देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:44 PM2018-11-22T17:44:44+5:302018-11-22T17:45:02+5:30

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतिय इसमाला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीसह मोबाईल, व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Indigenous pistol, sticks and three live cartridges, along with Pratiniti arrested | देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक

देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक

Next

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतिय इसमाला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीसह मोबाईल, व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण तसेच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने कंबर कसली आहे. या पथकाला गुरुवारी सिन्नरजवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत मालाविरूध्दचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºया मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील बेदमुथा कंपनीसमोर काही परप्रांतिय इसम हे अवैध्यरित्या अग्निशस्त्र बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयित रामबाबू हिरालाल गौतम (४५) रा. भारतगज जिल्हा अलाहबाद (उतरप्रदेश) हल्ली मुसळगाव एमआयडीसी यास पाठलाग करून ताब्यात घेतले.

Web Title: Indigenous pistol, sticks and three live cartridges, along with Pratiniti arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.