मुंबई-आग्रा महामार्गावर साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त इंडिगो कार पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:55 AM2017-11-11T00:55:37+5:302017-11-11T00:56:16+5:30
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा लावून अवैध मद्याची वाहतूक करणारी इंडिगो कार पकडली असून, त्यामध्ये साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा व वाहन असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़
नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा लावून अवैध मद्याची वाहतूक करणारी इंडिगो कार पकडली असून, त्यामध्ये साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा व वाहन असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ कारचालकाचे नाव संदीप सुकदेव पेखळे (३८, रा. दगूनानानगर, पिंपळगाव बसवंत) असे असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ ‘क्रॅक डाउन - ३’ या पोलिसांच्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यातील अवैध मद्य वाहतूक व विक्री तसेच हातभट्टीची दारू तयार करणाºयांवर छापे टाकले जात आहेत़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम सुरू केली असून, याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस दलाची निर्मितीही करण्यात आली आहे़ पिंपळगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांचे पथक गुरुवारी (दि.९) गस्त घालीत असताना एका कारमध्ये अवैध मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव शिवारात गायखे पेट्रोलपंपासमोर सापळा रचला होता. एक सफेद रंगाची इंडिगो कार (एमएच १५. बीएन ७१६०) अडवून तपासणी केली़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास देशमुख, मुनिर सय्यद, विष्णू जुंदरे, संजय पाटील यांनी ही कारवाई केली़