इंदिरानगरला पुन्हा सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:50 PM2019-09-18T23:50:45+5:302019-09-18T23:51:03+5:30

पोलीस ठाणे हद्दीतील वासननगर परिसरातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 Indiranagar again smuggled gold | इंदिरानगरला पुन्हा सोनसाखळी हिसकावली

इंदिरानगरला पुन्हा सोनसाखळी हिसकावली

googlenewsNext

इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीतील वासननगर परिसरातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सवात दोन घटना घडल्यानंतर पुन्हा मंगळवारी (दि.१७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तीन पादचारी महिला जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरून येत एकीच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिता शेलार (४०, रा. नंदी रेसिडेन्सी बडदेनगर) या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे नातेवाईक सुरेखा व सुनीता यांच्यासमवेत गामणे मळा येथून पायी जात होत्या.
मळ्याकडून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी शेलार यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख ३५ हजार रु पये किमतीचे सुमारे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून समांतर रस्त्यावरून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
चोख बंदोबस्त तरीही घटना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.१८) शहरात येणार असल्याने मंगळवारपासूनच शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस गस्त असतानाही रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस करत एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिले. सातत्याने इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलावर्गात भीती निर्माण झाली आहे.

Web Title:  Indiranagar again smuggled gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.