इंदिरानगर : अधिकाºयांना घेराव; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे होळीच्या दिवशी पाण्यासाठी बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:55 AM2018-03-02T01:55:11+5:302018-03-02T01:55:11+5:30

इंदिरानगर : येथील प्रभाग क्र मांक ३० मध्ये वर्षभरापासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त शेकडो महिला व नगरसेवकांनी अधिकाºयांना सुमारे दोन तास घेराव घातला.

Indiranagar: Allocation of officers; After the written assurance, after the agitation, on the day of Holi, | इंदिरानगर : अधिकाºयांना घेराव; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे होळीच्या दिवशी पाण्यासाठी बोंबाबोंब

इंदिरानगर : अधिकाºयांना घेराव; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे होळीच्या दिवशी पाण्यासाठी बोंबाबोंब

Next
ठळक मुद्देसंपूर्ण प्रभागात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठासुमारे दोन तास घेराव घालत जाब विचारला

इंदिरानगर : येथील प्रभाग क्र मांक ३० मध्ये वर्षभरापासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त शेकडो महिला व नगरसेवकांनी अधिकाºयांना सुमारे दोन तास घेराव घातला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रभाग क्र मांक ३० मधील पांडवनगरी, शिव कॉलनी, श्रद्धाविहार कॉलनी, राजीवनगर, अरु णोदय सोसायटी, महारु द्र कॉलनी, मानस कॉलनी, देवेंद्र सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी यांसह संपूर्ण प्रभागात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नळास कमी दाबाने पाणी येत असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा जेमतेम होत नाही, तर वापरण्यासाठी पाणी राहत नाही. त्यातच उन्हाची चाहूल लागताच गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण प्रभागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गुरु वारी (दि. १) होळी सणाच्या दिवशी शेकडोच्या संख्येने संतप्त महिला आणि नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना कलानगर चौकात सुमारे दोन तास घेराव घालत जाब विचारला. हंडा वाजवत ‘आम्हाला पाणी द्या, आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, आम्ही पाणी कोठून आणणार’ असे सांगत आपली कैफीयत मांडली. महापालिका प्रशासनाविरुद्ध बोंब करून आगळीवेगळी होळी साजरा केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अधिकाºयांना पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी सूचना केली. त्याची दखल घेत उपकार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, माणिक मेमाने, वसंत चिकोडे, विशाल सांगळे यांसह कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उपअभियंता रवींद्र धारणकर, शाखा अभियंता शंकर खाडे उपस्थित होते.

Web Title: Indiranagar: Allocation of officers; After the written assurance, after the agitation, on the day of Holi,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी