इंदिरानगर बोगद्यातून प्रवेश पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:23 AM2019-06-24T00:23:32+5:302019-06-24T00:24:37+5:30
इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० बेशिस्त वाहनचालकांना बोगद्यातून प्रवेश करणे चांगलेच महागात पडले आहे.
नाशिक : इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० बेशिस्त वाहनचालकांना बोगद्यातून प्रवेश करणे चांगलेच महागात पडले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने त्यांच्याकडून सुमारे ५ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
इंदिरानगर बोगद्यामधून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईसाठी तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकाराने राज्यातील पहिल्या आर्टीफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर सुरू करण्यात आला. बोगद्यातून केवळ इंदिरानगरकडून येणाºया वाहनांना प्रवेश करण्यास परवानगी दिली गेली आणि गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणाºया वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली. तरीदेखील सकाळी सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत व रात्री नऊ वाजेनंतर या बोगद्यातून बेशिस्तपणे विरुद्ध दिशेने मार्गस्थ होणाºया सुमारे अडीच हजार वाहनधारकांवर अद्याप दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.