इंदिरानगरवासीयांना चक्री बसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:18+5:302021-02-06T04:24:18+5:30
सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथ नगर चौफुली, विनय नगर, वडाळा ...
सुमारे अठरा वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार इंदिरानगर ते शालिमार सावरकर चौक, बापू बंगला, साईनाथ नगर चौफुली, विनय नगर, वडाळा नाका, मुंबई नाका, दीपालीनगर, जॉगिंग ट्रॅक, गजानन महाराज मार्ग, चार्वाक चौक अशी चक्री बससेवा सुरू होती. त्यामुळे इंदिरानगर, साईनाथनगर, शिवाजी वाडी, वडाळा नाका, भाभानगरसह परिसरातील उपनगरातील शेकडोंच्या संख्येने शहरात शिक्षणासाठी ये-जा करणारी विद्यार्थीवर्ग आणि नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक सदर चक्री बसचा लाभ घेत होते. परिसरात अपार्टमेंट व सोसायटीमुळे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेऱ्या वाढवण्याऐवजी शहर वाहतूक बस सेवेच्या वतीने सुमारे १३ वर्षांपूर्वी इंदिरानगर ते शालिमार चक्री बस सेवा बंद केली. त्यामुळे विद्यार्थीवर्ग व नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक वेळेस निवेदन व समक्ष भेटून चक्री बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. परंतु मागणी धूळ खात पडून असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.