इंदिरानगरला अजूनही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:23 AM2018-08-15T01:23:56+5:302018-08-15T01:24:11+5:30

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Indiranagar still water shortage | इंदिरानगरला अजूनही पाणीटंचाई

इंदिरानगरला अजूनही पाणीटंचाई

Next

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला असून, या संदर्भात पाणीपुरवठा विभागाला वेळोवेळी निवेदने देऊन व आंदोलन करूनही परिस्थिती कायम आहे.  गेल्या दीड वर्षांपासून इंदिरानगर भागातील आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर, एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे.  पिण्याचे पाणीसुद्धा पूर्णपणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ प्रभाग ३० मधील नागरिकांना बसत असून, परिसराला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने तसेच व्हॉल्व्हमनच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Indiranagar still water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.