इंदिरानगर : दोघा लूटारू महिलांसह तीघे अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:25 PM2019-07-02T16:25:32+5:302019-07-02T16:25:50+5:30
तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक : परिसरातील साईनाथनगर चौफुलीवरील एका दुकानातील गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या तीघा चोरट्यांसह इंदिरानगर परिसरातून मोबाईल चोरी करणा-या तीघा अल्पवयीन चोरट्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा लावून अटक केली. तीघा चोरट्यांना अंजनेरी येथील एका लॉजमधून तर अल्पवयीन गुन्हेगारांना राजीवनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, रोकड, दुचाकी असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्र वारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास साईनाथ नगर चौफुली लगत असलेल्या भावे प्लास्टो या दुकानात दोन महिला आणि एक पुरु ष बनावट ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी दुकानात काम करत असलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत लक्ष विचलीत करून पर्स व गल्लातील तीन हजाराच्या रोकडवर डल्ला मारून पोबारा केला होता. याप्रकरणक्ष इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून गुप्त बातमीदाराकडून माहिती घेण्याचे सुत्रे फिरविली. मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून अंजनेरी येथील एका लॉजमध्ये संशियत आरोपी असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश दांडगे, दत्तात्रय पाळदे, राजेश निकम, रियाज शेख, भगवान शिंदे, राजू राऊत, दत्तात्रय गवारे, विमल पाचोरे यांचे पथकाने अंजनेरी गाठले. संशयित लॉजच्या परिसरात पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित आरोपी सोनाली अर्जुन कांबळे (२८, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) उन्नती कैलास खाडम (३५ रा. सहवासनगर झोपडपट्टी) व त्यांचा साथीदार निलेश उर्फ विकी शशिकांत खंडीजोड (२३ रा. श्रमिकनगर) यांच्या शिताफीने मुसक्या बांधल्या. त्यांची कसून चौकशी केली असता दुकानातून चोरलेली पर्स, तीन हजार रु पयांची रोकड, पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
दुसºया गुन्ह्यात पोलिसांनी राजीवनगरमधून तीघा अल्पवयीन संशयित बालगुन्हेगारांना मोबाईल चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून महागडे दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे.