इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:28 PM2020-01-06T13:28:51+5:302020-01-06T13:29:09+5:30

मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही.

Indiranagar was robbed of three and a half lakhs in three houses | इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

Next
ठळक मुद्देवर्षभरात १६ सोनसाखळ्या हिसकावल्या

नाशिक : मागील काही दिवसांपासून परिसरात सोनसाखळी चोरीपाठोपाठ जबरी चोरी, मारहाण, घरफोड्यांसारखे गुन्हे वाढले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लूटल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मन्वंतर सोसायटीत राहणारे नितेश पाटील (३४) यांच्या १३ क्रमांकाची बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे एक लाख तीस हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी (दि.२१) बाहेरगावी गेले होते. आठवडाभरानंतर ते पुन्हा शनिवार (दि.४) घरी परतले असता घराचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत पाथर्डीफाट्यावरील अक्षय कॉलनीमधील शिव पॅलेसमधील महेंद्र प्रल्हाद बागुल (३२) यांच्या दुकानाच्या शटरला लावलेली कुलुपे अज्ञात चोरट्यांनी कापून तसेच बनावट किल्लीचा प्रयोग करून खोलत दुकानामध्ये प्रवेश केला. आतमधील काचेचा दरवाजाचेही कुलूप तोडत सुमारे ९५ हजार रूपये किंमतीचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तीसºया घटनेत पांडवनगरी परिसरातील श्री तिरु मल कॉम्प्लेसमध्ये राहणारे चंद्रन चंद्रशेखर नायर (२७) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ८ हजारांचे महागडे पाच मनगटी घड्याळे, सिंगापूर डॉलर, युएस डॉलर, आॅस्ट्रेलियन डॉलर, दुबईचे दिरहम, उमानिया, जेरूसलेम, इंडोनेशिया, सौदीचे रियाल, बांग्लादेशाचे टका यासह पाकिस्तान, नेपाळ, मलेशिया या देशांचे छंदरूपी साठविलेले सुमारे ४ हजार रूपयांचे चलन असा एकूण १२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद दिली आहे.

वर्षभरात १६ सोनसाखळ्या हिसकावल्या
चार दिवसांपुर्वीच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलानगर ते वडाळा दरम्यानच्या शंभरफुटी रस्त्यावर एका रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी मिळून प्रवासी युवकाला बेदम मारहाण करत त्याच्याकडे असलेली दहा हजाराची रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही. लूटमारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूणच इंदिरानग पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Indiranagar was robbed of three and a half lakhs in three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.