आडगावमध्ये इंदोरीकरांच्या किर्तनाला अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:11 PM2020-02-18T15:11:16+5:302020-02-18T15:13:54+5:30
आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली.
नाशिक :नाशिक शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आडगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने हभप निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या किर्तनाला सुरूवात झाली असून भर उन्हात आडगावमध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली आहे. इंदोरीकर यांचे आडगावमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. बैलगाडीवरून त्यांची जल्लोषात स्वागत मिरवणूकदेखील काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्यासंख्ये गावकरी सहभागी झाले होते.
आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली.यावेळी इंदोरिकर यांनी आपल्या खास शैलीत किर्तनाला सुरूवात करताना प्रथम शिवरायांना अभिवादन केले. प्रस्तावनेत ते म्हणाले, राज्याचे ग्रामविकास खाते ही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे. एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी किर्तनाला सुरूवात केली.