नगरसेवकपदी इंदुमती नागरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:03 AM2019-06-08T01:03:15+5:302019-06-08T01:03:31+5:30
येथील प्रभाग क्र मांक दहा ‘ड’ जागेसाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्ताजी वामन यांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार तथा दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सातपूर : येथील प्रभाग क्र मांक दहा ‘ड’ जागेसाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्ताजी वामन यांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार तथा दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नागरे यांची बिनविरोध निवड झाली असली तरी तांत्रिकदृष्ट्या माघारीच्या वेळी संंबंधिताने अर्ज दाखल केल्यानंतरच ही प्रक्रिया अधिकृतरीत्या पूर्ण होईल व त्याचप्रमाणे निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र नियोजित मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २४ जून रोजीच प्रदान करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या सातपूर येथील प्रभाग क्र मांक १० ‘ड’मधील नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर दि. ३० मेपासून निवडणूक प्रक्रि या सुरू झाली. दि. ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
शेवटच्या दिवशी भाजपाकडून दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई यांनी अर्ज दाखल केला होता.
बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपाला शिवसेनेबरोबरच प्रामुख्याने राष्ट्रवादी, काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळेच भाजपाचे उमेदवार इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड होऊ शकली. भाजपाने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे भाजपा सूत्रांनी सांगितले.