औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:32 AM2018-10-10T00:32:07+5:302018-10-10T00:34:20+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत ऐन दिवाळीच्या तोंडावर दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने येथील कारखान्यांच्या उत्पादनात घट होऊ लागली असून यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
गोंदे औद्योगिक वसाहतीत अनेक छोटे-मोठे कारखाने असून, या सर्व कारखान्यांचा भार एकाच फीडरवर असल्यामुळे येथील परिसरात काही दिवसांपासून पाच ते दहा मिनिटात वीज खंडित होत आहे. दिवसातून पाच ते सहा वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे कारखान्यांमध्ये यंत्र बिघाड, उत्पादनात घट आदी समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे येथील उद्योजक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. येथे वीज असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. वेळेवर वीजबिल भरण्यास प्राधान्य दिले जाते; परंतु त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांकडून होत आहे. येथील कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रि या सतत चालू असल्यामुळे वीजपुरवठ्याची अत्यंत आवश्यकता असते. तो खंडित झाल्यानंतर उत्पादन प्रक्रि या पुन्हा सुरू करताना हजारो रु पयांचे नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. बाहेर जाणाºया पक्क्या मालाला उशीर होत असून, याचाही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड उद्योजकांना सहन करावा लागत आहे.
सततच्या विजेच्या लपंडावामुळे उत्पादनाच्या खराब मालातही भर पडत असल्याने सर्वात जास्त फटका गोंदे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना बसला आहे. त्यामुळे येथील कारखानदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे यावेळी येथील उद्योजकांनी बोलून दाखविले. विजेच्या लपंडावामुळे काही छोट्या कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवल्यामुळे येथील कामगारांना दोन दिवस सुट्टीदेखील दिल्याचे कामगारांनी यावेळी सांगितले.