चांदवड महाविद्यालयाची औद्योगिक अभ्यास भेट
By admin | Published: February 21, 2016 10:30 PM2016-02-21T22:30:57+5:302016-02-21T22:42:19+5:30
चांदवड महाविद्यालयाची औद्योगिक अभ्यास भेट
चांदवड : येथील आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या अभ्यास भेटीचे आयोजन कोपरगाव येथील सुप्रसिद्ध भन्साळी टॅक्टर्स प्रा. लि. या औद्योगिक संस्थेत करण्यात आले.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी भन्साळी प्रा. लि. येथील प्लॉन्टचे अवलोकन व परीक्षण केले. कोपरगावसारख्या लहान गावात राहुन भन्साळी गु्रपने आफ्रिका व अन्य देशात शेती अवजारे निर्यात करतात ही भूषणावह बाब आहे. उद्योजकतेमुळे परिसराचा, गावाचा म्हणजेच राष्ट्राचा आर्थिक विकास होतो हे विद्यार्थ्याच्या लक्षात आले. या औद्योगिक संस्थेचे कार्यकारी संचालक संजय भन्साळी व त्यांचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती
दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य प्रा. डी. एन. शिंपी, डॉ. सुरेश पाटील, प्रा. एस. पी. खैरनार, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पी. आर. सोहनी, प्रा. नितीन जैन, प्रा. देवेंंद्र दगडे, प्रा. ए. एस. छाजेड, डॉ. सी. के. कुदनर उपस्थित होते. (वार्ताहर)