जैन अभियांत्रिकीची औद्योगिक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:00 PM2018-03-22T23:00:45+5:302018-03-22T23:00:45+5:30
चांदवड : येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागाची तीन दिवसीय औद्योगिक भेट महाबळेश्वर येथे झाली.
चांदवड : येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागाची तीन दिवसीय औद्योगिक भेट महाबळेश्वर येथे झाली. यावेळी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्या प्रो लि. व मालास फु्रट लि. या कंपन्यांना भेट देऊन त्यांची उत्पादन पद्धत विद्यार्थ्यांनी बघितली. भावेश भाटिया यांनी मुलांसमोर यशस्वी उद्योजक बनण्याचा मूलमंत्र मांडला. सदर औद्योगिक भेटीस प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ. ए. आर. बोरा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. राहुल थोरात, प्रा. लीना लासी यांच्याकडून औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.