किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांना उद्योगाचा दर्जा; निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:16+5:302021-07-05T04:10:16+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम ...

Industry status to retailers; Welcome to the decision | किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांना उद्योगाचा दर्जा; निर्णयाचे स्वागत

किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांना उद्योगाचा दर्जा; निर्णयाचे स्वागत

Next

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मिळत असलेल्या बॅंकांच्या सवलती या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आजपर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रियाॅरिटी लेंडिंग गाइडलाइन्सप्रमाणे फक्त उद्योगांना प्रॉयरिटी सेक्टरमध्ये लोन दिले जात होते. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांनासुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्या वर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भाजप उद्योग आघाडीची जबाबदारी सुद्धा यादृष्टीने आता वाढली आहे. अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने कोरोना काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी संरक्षित केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार आणि समन्वयक रविष मारू यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Industry status to retailers; Welcome to the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.